हंगाम काढण्यासाठी अखेर शेतकऱ्यांनीच तयार केला श्रमदानातून पांदणरस्ता
सिटी बेल | हदगाव | राहुल बहादूरे |
शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करत आहे. शेतक – यांना शेतीतील कामे करण्यासाठी पांदण रस्ते मात्र उदासीन धोरणामुळे कागदोपत्रीच दिसत आहेत. हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा, बामणी फाटा, पळसा, मनाठासह परीसरात अनेक गावातील शेतकऱ्यांना पांदन रस्ता नसल्याने शेतातीलमाल काढून घराकडे आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हदगाव, वांरगा रोडवर बरडशेवाळा ते बामणीफाटा दरम्यान बरडशेवाळासह परिसरातील भावीकाचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर देवस्थानाला ये जा करण्यासाठी व बरडशेवाळा बामणी शेत शिवारातील शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी पांदण रस्ता नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या वर्षी सततच्यपावसाने पांदण रस्ता जागोजागी हु गेले आहेत. दिवाळीच्या अगोदर शेतातील माल काढण्यासाठी पदरमोडने अखेर नाईलाजाने शेतकऱ्यांनी श्रमदानातून पांदण रस्ता तयार केला.
देवस्थान खंडोबा मंदिर असल्याने पांदण रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध असल्याने संबंधित विभागाने लक्ष देऊन पक्का पांदण रस्ता करुन द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे .








Be First to Comment