सिटी बेल| मुंबई | विठ्ठल ममताबादे |
मुंबई येथे मराठी पत्रकार हॉल, आझाद मैदान येथे अमरदीप बालविकास फाउंडेशन व टिएमजी क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अश्या व्यक्तींना राज्यस्तरीय टि एम जी प्यारा माउंटन अचीव्हमेंट राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातून फक्त चाळीस युवा युवतीना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये अनिष चंद्रहास पाटील व गोपाल दिनकर म्हात्रे ( सारडे उरण) यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वितरण करण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.
अभिनेत्री प्रेमा ताई, डॉक्टर अमजद खान पठाण कर्करोग शास्त्रज्ञ, सुनिता ताई शिंदे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एनसीपी, ज्योती ठाकरे आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ( राज्यमंत्री ) दर्जा, अभिनेता प्रदीप पटवर्धन,अभिनेत्री नयन पवार,फिल्म सेंसर बोर्ड के सदस्य इत्यादी दिग्गज मंडळी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला.








Be First to Comment