सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांची गणना एक होतकरू व कार्यक्षम निरिक्षक म्हणुन नेहमीच केली जाते. कर्तव्य नव्हे जबाबदारी ह्या उदात्त हेतुने ते सतत आपले कार्य करत असतात. कोविड महामारीच्या काळात त्यांनी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल त्यांचा कोविड योद्धा म्हणुनही रेल्वे प्रशासनाकडुन यथोचित सत्कार करण्यात आला होता.
बारा श्रमिक स्पेशल गाड्यांमधे प्रवासी व्यवस्थेचे कार्य त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने उत्तम प्रकारे हाताळले. माथेरानची राणी म्हणुन जगप्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन पुन्हा चालु करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांच्यामधे समन्वय साधुन ही गाडी पुन्हा चालू करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान मिळाले. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणुन त्यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडुन विशेष कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक मिळाले असुन त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्य कौशल्याची दखल घेत रेल्वे प्रशासनातर्फे या वर्षीचा डिआरएम पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.

चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांना डिआरएम पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने अभिनंदन केले तसेच रेल्वे आणि स्थानिक अशा सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







Be First to Comment