Press "Enter" to skip to content

कळंबोली वसाहतीत पाणी साचले, नालेसफाईचा बोजवारा

सिडको प्रशासनाचा फोलपणा उघड, ठेकेदाराला अभय

सिटी बेल | कळंबोली  | प्रतिनिधी |

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कळंबोली शहरात पाणी साचले असून सिडको  प्रशासनाचा फोलपणा या पहिल्या पावसात उघड झाला आहे. कळंबोलीत पाणी साचले आहे, तर पहिल्याच पावसात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचेही तीनतेरा वाजले. सिडकोने शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता, मात्र या पावसाने त्यांचा हा दावा खोटा असल्याचे दाखवून दिले. कागदावरच नालेसफाई झाल्याचे सिडको अधिका-यांचे पितळ उघडे पडले आहे.  

सिडको प्रशासनाने  दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मान्सुनपुर्व गटारांच्या तोंडावरील गाळ काढताना नाममात्र साफसफाई केल्याने कळंबोली शहरात पाणीच पाणी झाले आहे . गटाराच्या तोंडावरील काढलेला गाल तसाच पडून राहिल्याने काही दिवसांपूर्वी  पडलेल्या पावसाने पुन्हा तो गाळ  गटारात वाहून जावून गटारांची परिस्थिती जैसे थे आहे त्यामुळे गेली दोन दिवस पडत असलेल्या पावसाने कळंबोली शहरात पाणीच पाणी झाले आहे. 

दरवर्षीच्या पावसाने कळंबोली वसाहत जलमय होत असताना त्यातून कोणताही धडा सिडको प्रशासन घेताना दिसून येत नाही. या दोन वर्षे कोरोना महामारीचा पुरेपूर फायदा उठवत कामे न करताच बिलं अदा  केल़्याचे समजते यावर्षी मान्सुनपुर्व कामाची सुरुवात कळंबोली सिडको प्रशासनाने एप्रिल महिन्याच्या मध्यांतर झेनित काँन्ट्रक्सनच्या माध्यमातून  केली होती. नाममात्र गटाराच्या तोंडावरून काढलेला गाल महिनाभर तसाच पडून राहिल्याने काही दिवसांपूर्वी  पडलेल्या पावसाने तो वाहून गटारात जावून यावर्षी कळंबोली शहरात पाणी साचून जलमय होण्याची भीती नागरिकांना लागली आहे.

कळंबोली वसाहत समुद्र सपाटीपासून तीन मीटर खाली असल्याने भरतीच्या वेळी गटाराची लाईन व मलनिस्सारण वाहिनी तुबंली जावून येथील  बैठ्या घरांच्या शौचालयातून घाण पाणी येवून गेली वीस वर्षापासून नागरिक नरक जीवन  जगत आहेत तर काहीनी दुसरीकडे राहणे पसंत केले आहे. मलनिस्सारण वाहिनीतून घाण पाणी  घरात   शिरू नये म्हणून  सिडकोकडून  कोणतीही उपाययोजना केली जात नसून जनरेटरद्वारे मलनिस्सारण वाहिनीचे पाणी दुस-या चेंबरमध्ये टाकून वेळ मारून नेत आहे. 

 

कळंबोली वसाहतीला अनेक समस्यानी वेढले असून नगरसेवक रविंद्र भगत यांनी याबाबत आमरण उपोषणही केले होते. त्यावेळी सिडकोने सुविधा देण्याचे आश्वासन देवून सुद्धा ते पुर्ण केले केले नाही.  विशेषता प्रभाग क्रमांक 8, एलआयजी २ सेक्टर ३  मध्ये सिडकोच्या जुन्या इमारती आहेत. या ठिकाणी अल्प उत्पादन गटातील श्रमजीवी लोक राहतात. ही वसाहत समुद्रसपाटीपासून खाली असून  संपूर्ण वसाहतीत दरवर्षी  पावसाळ्याचे पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून  त्रेधातिरपीट उडते. 25 आणि 26 जुलै 2005 ला याठिकाणी महापूर येऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. त्यानंतर सिडकोने काही प्रमाणात उपाययोजना केल्या. तरी सुद्धा कमी पावसातही या ठिकाणी पाणी साचते. असी बिकट परिस्थिती येत असताना येथील नाले सफाई केली नसल्याने यावर्षी सुद्धा कळंबोली जलमय होण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे  या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचबरोबर कोरोना वैश्‍विक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सिडकोने खबरदारी घेणे आवश्यक असताना अशी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. 

मान्सुनपुर्व  गटारे साफ करताना  काढण्यात आलेला गाल उचलली गेला नसल्याने तो पडून राहिलेला गाल पडलेल्या पावसाने वाहून गटारात गेला ती गटारे पुन्हा साफ केली जातीस असे कळंबोली सिडको अधिकारी इरशात पाला यांनी सांगितले होते पण ती गटारे साफ केली नसल्याने वसीहतीत जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. 

वसाहतीत पाहणी चालू असून ज्या भागात पाणी साचले आहे ते साचणार नाही यासाठी उपाययोजना करून पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जाोमार 

विलास बनकर
कार्यकारी अभियंता सिडको कळंबोली विभाग  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.