सिटी बेल | बेलापूर |
बेलापूर गावातील खंदे कार्यकर्ते विज्ञान म्हात्रे यांच्या पुढाकाराने जागतिक पर्यावरण दिनी झाडे लावून जगवण्याचा संकल्प घेतला गेला.
सिटी बेलच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ह्या मागील उद्धिष्ट, केवळ पर्यावरण वाचवणे असे सांगितले, त्याचबरोबर आजच्या कोरोना काळात ऑक्सिजन किती महत्वाचे आहे हे सर्वांना कळलेच असेल, असेही त्यांनी सांगितले. वड, पिंपळ, कडूलिंब यासारखी झाडे लावून ती जगवली तर त्याचा चांगला परिणाम सर्वत्र पाहायला मिळेल असेहि नमूद करायला ते विसरले नाहीत.

या प्रसंगी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, “२५ वर्षांपूर्वी बेलापूर गाव हे निसर्ग रम्य होते. समुद्र , तलाव, बलाढ्य डोंगर, वनराई यांनी चहुबाजूंने सजलेले होते, पण विकासाच्या दृष्टीने आज गावाचा चेहराच बदलून गेला आहे. आज गावातील सर्व मंडळी या माध्यमातून एकत्र येऊन वृक्षारोपण करून त्यांनी पुनःश्च हरिओम केला आहे, आणि हा उत्साह पुढेही गावकर्यांनाही असाच दाखवावा असेही त्यांनी आवाहन केले.”


ह्या वृक्षारोपणाच्या दिनी गावातील प्रतिष्ठित मंडळी सौ. स्वाती घैसास, सौ. ज्योत्स्ना मानकामे, प्रमोद जोशी, मनोज म्हात्रे, जगदीश जैन, शाम मोहननं, ज्योती बेबी, सिद्धांत पाटील, विजय सिनलकर, जितेंद्र प्रजापती यांची प्रमुख उपस्थिती होती. योगेश म्हात्रे, किशोर कुलकर्णी आणि वैभव सोनटक्के यांनी ह्या कार्यक्रमासाठी पूर्व तयारी करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.








Be First to Comment