Press "Enter" to skip to content

भाजपातील पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

शिवसेना हा शब्दाला जागणारा पक्ष असून दिलेले आश्‍वासन पूर्ण करणार : खासदार श्रीरंग बारणे

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

शिवसेना हा शब्दाला जागणारा पक्ष असून येत्या 2 ते 3 महिन्यात या विभागातील पाण्याचा प्रश्‍न, जलकुंभ, रस्ता काँक्रीटीकरणाचा प्रश्‍न निकाली काढणार. भाजपने फक्त गेल्या 25 वर्षात या विभागाला आश्‍वासनाची खैरात दिली व मत घेतली. परंतु शिवसेना पहिले वचनपूर्ती करणार व मग हक्काने मते मागणार असे प्रतिपादन शिवसेना खा.श्रीरंग बारणे यांनी आज पालेबुद्रुक परिसरातील भाजपाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत करताना केले.

पालेबुद्रुक येथील पक्षप्रवेश तसेच जलकुंभ उद्घाटन जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संपन्न झाला. यावेळी खा.श्रीरंग बारणे, जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख  रघुनाथ पाटील, तालुका संघटक रामदास पाटील, उपजिल्हा युवा सेना अधिकारी अवचित राउत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, उपतालुकाप्रमुख योगेश ढोपरी, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, नवीन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे, विभाग प्रमुख विश्‍वास पेटकर, दत्ता भगत, प्रमोद पाटील, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, विभाग अधिकारी मनोज कुंभारकर, जीवन पाटील आदी उपस्थित होते.

पाले बुद्रुक येथे भाजपचे पदाधिकारी योगेश तांडेल, संदिप तांडेल, नरेश भगत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. सिद्धी संदीप तांडेल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिलांनी आज शिवसेनेमधे जाहीर पक्षप्रवेश केला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील ह्यानी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खा.श्रीरंग बारणे, जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख  रघुनाथ पाटील, तालुका संघटक रामदास पाटील, उपजिल्हा युवा सेना अधिकारी अवचित राउत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, उपतालुकाप्रमुख योगेश ढोपरी, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, नवीन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे, विभाग प्रमुख विश्‍वास पेटकर, दत्ता भगत, प्रमोद पाटील, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, विभाग अधिकारी मनोज कुंभारकर, जीवन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेने अहोरात्र मेहनत केली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदींनी महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी अत्यंत ताकदीने काम केले आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात येताना दिसत आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.