कळंबोली शहरातील ग्राहकांना देण्यात आलेले सदोष जलमापके बदलून रहिवाशींची लुटीतून सुटका करावी – आत्माराम गावंड यांची मागणी
सिटी बेल । कळंबोली । विकास पाटील ।
कळंबोली वसाहतीमधील पाणी चोरी रोखण्यासाठी व पाण्याच्या वापराप्रमाणे देयके देण्यात यावीत यासाठी जलमापके बसविण्यात आली याचे रहिवाशीनी स्वागत केले पण सदोष जलमापकामुळे नागरिकांवर जास्तीची देयके लादली जात आहेत त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. तेव्हा ही सदोष जलमापके बदलण्यात येवून रहिवाशींची लुट थांबवावी व जी खराब जलमापके खरेदी केली आहेत त्याची चौकशी करून जबाबदार अधिका-यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक आत्माराम गावंड यांनी सहायक अभियंता सिडको यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
कळंबोली वसाहती मध्ये रहिवाशांनी गरजेपोटी आणि २००५ साली आलेल्या महापूरापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घरांची वाढीव बांधकामे केली आहेत. वाढीव बांधकामाने सिडकोच्या निकृष्ठ बांधकामाना मजबूतआली आहे. तर वसाहतीची लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या स्थितीत पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन कोलमडून पडले होते. परिणामी, लोकसंख्या नक्की किती, पाण्याची गरज किती, याचा ताळमेळ लावणे सिडकोला कठीण झाले होते. एका विभागाचे पाणी पळवून दुसऱ्या विभागाची तहान भागवण्याची कसरत सिडकोला करावी लागत होती. याचा सर्वाधिक फटका एल.आय.जी.या अल्प उत्पन्न गटातील बैठ्या घरातील रहिवाशांना बसत आहे.
या पुर्वी आम्ही आपली प्रत्यक्ष भेट घेऊन कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, अपुरे पाणी मिळणे, गढूळ, दुषित पाणी या संदर्भात चर्चा केली असता ,कळंबोलीची लोकसंख्या लक्षांत घेता ३७ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे सध्या २७ दशलक्ष लिटर इतकाच पुरवठा होतो. त्यातही गळतीचे प्रमाण ४ ते ५ टक्के आहे. या संदर्भात लक्ष वेधले असता,आपण शहरासाठी वाढीव पाण्याची मागणी केली आहे असे सांगीतले होतेत रोज ३२ दशलक्ष लिटर पाणी मिळाले तरी टंचाईची समस्या ब-यापैकी दूर होईल, असा आपण दावा केला. सध्या पाणी पुरवठ्यात सिडकोचे आर्थिक नुकसान होत आहे. या करिता शहरात जलमापके बसविण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. तसे झाल्यास सिडकोचे होणारे मोठ्या प्रमाणातील आर्थिक नुकसान टाळता येईल.
कळंबोली शहरात केल-वन सेक्टर ५ ई, एल.आय.जी.१ सेक्टर ३, व सेक्टर २, एल.आय.जी.२ सेक्टर १ व एल.आय.जी.२ सेक्टर २ इ , ई-वन सेक्टर ३ ई, के.एल.२ सेक्टर ६ ई, व सेक्टर ५, के.एल.४.सेकटर ४ ई, व ५ ई, के.एल.५ सेक्टर २, के.एल.५. सेक्टर ३ ई, के.एल.६ सेक्टर ३ ई, के.एल.५ व के.एल.६ सेक्टर १ई, आणि एफ पाईप आदी प्रकारच्या सदनिका साठी, पाण्याचा वापरावर लक्ष ठेवण्यासाठी जलमापके बसविण्याचा निर्णय घेतला असता सर्व ग्राहकांनी सिडकोचे स्वागत केले होते, काही ठिकाणी जलमापके सुरक्षित राहावेत म्हणून झाकणे बसविण्यात आले तर काही ठिकाणी झाकणे लावण्यात आली नाहीत, विशेष म्हणजे सिडकोने ज्या कंपनी कडून घाऊक पद्धतीने जलमापके घेतली त्या कंपनी कडून जलमापके सुरक्षित आहेत तसे महानगर पालिका प्रशासन कडून प्रमाण पत्र दिले जाते, परंतु त्या कंपनीने एकाही ग्राहकाला प्रमाणपत्र दिलेले नाही, हि चुक सिडकोची नाही का? ज्या कंपनीने जलमापके देवू केली आहेत व दिली आहेत ती कळंबोली शहरातील बहुतेक जलमापके सदोष असून तसा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. तंत्रज्ञान नविन असताना सदर कंपनी बाबत सिडकोचे अधिकारी नरमाईचे धोरण घेत आहेत….यातच घोडे आडले आहे.
सिडकोने अधिकारी दर दोन महिन्यांनी ज्या ग्राहकांसाठी जलमापके बसविण्यात आली आहेत त्याची रिडिंग घेण्यासाठी सिडको अधिकारी, कर्मचारी येत आहेत, जी जलमापके बसविण्यात आली आहेत त्यांना झाकणे बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यात बिघाड होत आहे त्याचबरोबर एमको कंपनीने जलमापके दिली आहेत त्यात बिघाड होण्याचे प्रमाण वाढले असून हे जलमापके पुरविणाऱ्या कंपनी कडून सदोष जलमापके बदली करवून घेणे, किंवा कंपनीवर कारवाई करण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्यात यावा.पण सदोष जलमापकामुळे रहिवाशीवर जास्त पाण्याचा खर्च टाकण्यात येवू नये ही जलमापके खरेदीचा खर्चहा नागरिकांच्या खिसातून करण्यात आला आहे तेव्हा अशी जलमापके खरेदी करणारावर कारवाई करून पुन्हा अशी पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
सध्या कोरोना महामारिच्या निमित्ताने नागरीकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.त्याच प्रमाणे उत्पन्नाचे अनेक स्त्रोतही बंद झाले आहेत. जगणं मुश्किल झाले आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न सर्वाना भेडसावत आहे ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मार्च २०२०पासुन लोकडाऊन घोषित केले आहे.अद्यापही काही क्षेत्रात लाँकडाउन मध्ये शिथिलता देण्यात आलेली नाही.त्याच बरोबर लाँकडाऊन मुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेल्या मुळे त्यांची आवक बंद झाली आहे.मात्र नियमित घरगुती खर्च हे करावाच लागत आहेत.त्या मध्ये घरभाडे, वीजबिल,सिडकोचे पाणी बिल, तसेच विविध प्रकारचे बँकेचे हप्ते अशा अनेक प्रकारच्या खर्चाने ग्राहकांना ग्रासले आहे.या बाबत आपण विचार करून ग्राहकांना सहकार्य करावे.








Be First to Comment