कामोठे येथे शिवभोजन थाळी उपक्रमाचे उद्घाटन
सिटी बेल । कळंबोली । विकास पाटील ।
महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराधार निराश्रित , मजूर , बेघर असणाऱ्या अनेकांसाठी संजीवनी ठरत आहे. या उपयुक्त उपक्रमाचे उद्घाटन पनवेल तालुका शिवसेना संघटक भरत पाटिल याचा हस्ते कामोठे येथे करण्यात आले.
यावेळी नगरसेवक शंकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमूख रामदास पाटिल विधानसभा संघटक दिपकजी निकम, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी लिलाधर भोईर माजी शहरप्रमूख धाया गोवारी माजी विभागप्रमुख मंगेश बोबडे उपस्थित होते.
राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी . ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही , रोजच्या जेवणाची भ्रांत आहे . ज्यांच्या घरात चूल पेटत नाही , अशा निराश्रित , निराधार , बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन योजनेने संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली . कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना मोफत सुरू करण्यात आली असून अनेकांच्या पोटाची भुक भागविणारे ठरली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोरोना काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता ती नोफत रु केली आहे . यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे . रायगड जिल्ह्यासाठी या काळात ही योजना अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन चालवत आहे . सद्यस्थितीत कोरोना महामारीत संचारबंदीच्या काळात ही उपाययोजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरू झाली आहे . शिवभोजन थाळीने अनेकाना उभारी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात संचारबंदी काळात शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे .








Be First to Comment