शेकडो मित्रांचा राजा हरपला !
सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।
पनवेलकरांना सुपरिचित असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजीव ( राजा ) कदम (वय ५६) यांचे गेले अनेक दिवस मृत्युशी झुंज देत असताना अखेर आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
दि १३/११/२०२०रोजी कोवीड-१९चा अहवाल पाँझिटीव्ह आल्याने दि, ३०/११/२०२० ते दि, १२/१२/२०२० पर्यंत त्यांच्यावर डाॅ. डी. वाय. पाटील हाँस्पिटल नेरुळ येथे उपचार सुरू होते त्यानंतर त्यांचा डोळ्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अपोलो रूग्णालय सीबीडी बेलापूर येथे दि १३/१२/२०२० रोजी दाखल करण्यात आले.
तेथे डॉ. नक्टे. ई.एन. टि. व डाॅ. सुनिल कुट्टी निरो सर्जन, यांच्या मार्गदर्शन खाली उपचार सुरु असताना आज दि ७/४/२०२१ रोजी सायंकाळी दिर्घ उपचार दरम्यान अपोलो रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
राजा कदम हे संपूर्ण पोलीस दलात त्याचप्रमाणे पनवेलच्या सामाजिक व राजकिय क्षेत्रात देखील सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने पनवेल परिसरातून सर्व क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.








Be First to Comment