सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील सुकेळी आदिवासीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच आधार फाऊंडेशनचे सदस्य कैलास गंगाजी वाघमारे यांचे शुक्रवार दि. २ एप्रिल रोजी सांयकाळी पनवेल येथील लाईफ लाईन हाँस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय- 38 वर्षे होते.
त्यांच्यावर शनिवार (दि.३) रोजी सकाळी ११ वा. सुकेळी येथील वैंकुठ स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय जमला होता.
कै. कैलास वाघमारे यांचे दि. २५ मार्च रोजी नागोठणे येथे दुचाकीवरुन जात असतांना त्यांना कारने जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्यामुळे त्यांना तातडीने पनवेल येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर सात ते आठ दिवस उपचार सुरु असतांनाच त्यांना त्यांच्या शरिराने योग्य असा प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली. कै. कैलास वाघमारे यांचा स्वभाव अंत्यत प्रेमळ व मनमिळाऊ होता. ते एअरटेल या कंपनीच्या केबललाईनमध्ये रुट गार्ड म्हणुन ४ वर्षांपासुन कार्यरत होते. तसेच रोहा तालुक्यातील प्रतिष्टित समजल्या जाणा-या आधार फाऊंडेशनचे सदस्य या पदावरही चांगले काम केले आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने संपुर्ण वाघमारे तसेच सुकेळी आदिवासीवाडीवर शोकाकुल वातावरण पसरले आहे.
कै. कैलास यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी, एक मुलगी, दोन भाऊ व मोठा मित्र परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि. ११ एप्रिल व उत्तरकार्य बुधवार १४ एप्रिल रोजी सुकेळी आदिवासीवाडी येथे होणार असल्याचे वाघमारे कुंटुबियांकडुन सांगण्यात आले आहे.








Be First to Comment