सिटी बेल लाइव्ह । म्हसळा । उदय कळस ।
तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मौजे नेवरूळ येथील अमित महागांवकर यांच्या पत्नी तथा नेवरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आर्या अमित महागांवकर यांचे पहाटेच्या सुमारास हृदयवीकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
मृत्यूसमई त्या अवघ्या 32 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात 6 वर्षाची मुलगी, पती,आई -वडील, सासू -सासरे असा परिवार असून त्यांच्या लग्नाला केवळ आठ वर्षे झाली आहेत. अत्यंत अभ्यासू, शांत आणि मनमिळाऊ सरपंच म्हणून संपूर्ण तालुक्यात त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण म्हसळा तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेवरूळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.








Be First to Comment