सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे विश्वस्त, माजी उपाध्यक्ष, तथा रायगड जिल्हा खो खो असो. चे माजी कार्यवाह नथुराम (भाऊ) पाटील यांचे निधन झाले आहे.
मा. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच राज्य पातळीवर कबड्डी, कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष पद सांभाळल आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील कबड्डी,खो खो, कॅरम, अथलेटिक्स असे विविध अश्या 12 संघटनेचे कार्यवाह म्हणून नथुराम पाटील यांनी पदभार सांभाळला आहे. त्यांच्या निधनाने क्रिडाप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








Be First to Comment