सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
शिवसेना उपनेते, माजी महापौर, माजी आमदार (विधानपरिषद) , एकविरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष व कोळी समाजाचे नेते स्वर्गीय अनंत तरे यांची शोक सभा नवीन शेवा शाखेत संपन्न झाली.
शोकसभेत शिवसेना उरण तालुक्यच्या वतीने अनंत तरे यांना तसेच शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे उरण तालुक्यातील जेष्ठ निवृत्त शिक्षक स्वर्गीय कृष्णराम आत्माराम ठाकूर (ठाकूर गुरूजी) यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी अनंत तरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. रायगड जिल्हा व तरे यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या जाण्याने एक तेजस्वी तारा निखळला व अनंतात विलीन होऊन शिवसेना एका चांगल्या नेतृत्वाला मुकली अशी भावना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केली. तसेच आज मी इथं पर्यंत पोहचलोय ते केवळ माझे गुरुवर्य ठाकूर गुरुजीमुळे अशी आदर पूर्वक भावना त्यानी ठाकूर गुरुजींबद्दल आपल्या मनोगतात व्यक्त केली.

या शोकसभे प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख व जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, उप जिल्हाप्रमुख नरेशजी रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी.एन. डाकी, तालुका संपर्क प्रमुख जे. पी. म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, उपजिल्हा संघटक ममता पाटील, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, के.एल्. कोळी व धिरज बुंदे आदींनी आपल्या मनोगतातून शोक व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन उप तालुका संघटक के. एम्. घरत यांनी केले.
व्यासपीठावर ग्राहक संरक्षण जिल्हा कक्ष प्रमुख रमेश म्हात्रे,महिला विधानसभा संघटक ज्योती म्हात्रे, उपतालुका प्रमुख कमळाकर पाटील, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, विभाग प्रमुख संदेश पाटील, शैलेश पंडित,माजी अध्यक्ष जगजीवन भोईर हे होत. यावेळी शाखाप्रमुख शैलेश भोईर, कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, ग्राहक संरक्षण कक्षाचे अजय सुतार, पंकज सुतार, संदीप जाधव, शेखर पडते, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भोईर, सोनारी मा शाखाप्रमुख हरिश्चंद्र कडू , परशुराम ठाकूर, भुपेंद्र भोईर,निलेश घरात, कमळाकर घरत व शिवसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment