सिटी बेल लाइव्ह । ठाणे । सुनील ठाकूर ।
शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (६७) यांचे निधन झाले. विधान परिषदेवर अनंत तरे २००० ते २००६ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत होते. याआधी अनंत तरे तीन वेळा ठाणे महापालिकेचे महापौर होते. लोणावळा येथील श्री एकविरा देवी देवस्थानचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची शोकसभा अनंत तरे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झाली.

यावेळी माजी मंत्री गणेश नाईक खासदार राजन विचारे, भाजपचे आमदार कोळी समाजाचे नेते रमेश पाटील, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आगरी समाजाचे नेते दशरथ पाटील, राजाराम पाटील, पत्रकार कैलास म्हापदी, समाजसेवक नानजी खिम्मजी ठक्कर ठाणावाला, उद्योजक नंदकुमार साळवी, दिगंबर सुखी, एकविरा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी नवनाथ देशमुख , काळुराम देशमुख, विलास कुटे, मारुती देशमुख, नगरसेवक नजीब मुल्ला, गायक हर्षला पाटील, शाहिर अर्जुन अटाळीकर, शाहिर रमेश नाखवा, मनसे चे विश्वजित जाधव, भाजपचे विक्रांत भोईर, राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना चे मधुकर वैती, प्रकाश वैती, दता वैती, ठाणे महापालिका शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्वातंत्र्य सेनानी सुरेश ठाणेकर, माजी नगराध्यक्ष संपदा जोगळेकर, ठाणे जिल्हा कोळी समाज चे युवा नेते परेश कांती कोळी, कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील, डि एम कोळी, जयेंद्र खुणे, देवानंद भोईर, माजी नगरसेवक कूष्ण कुमार कोळी, दत्ता भोईर (उरण ), के .एल .कोळी (मा .चेअरमन करंजा सोसायटी ) आदी सह त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment