सिटी बेल लाइव्ह । आवरे । प्रतिनिधी ।
उत्तम गुण घ्यावे अवगुण टाळावे , मारावे परी किर्तीरुपी उरावे हे जग नाशवंत आहे एकदा हे शरीर गेले की फक्त आणि फक्त त्याची कर्मे राहतात मग तो मनुष्य किती ही मोठा असू द्या आवरे गाव ही विशेष नररत्नची खान होय आवरे गावाच खास वैशिष्ट्य म्हणजे साक्षात भोळेनाथच वरद हा येथील सर्व नागरिक वर आहे आवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक चांगदेव हसुरांम ठाकूर यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झालं.
मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्ष होते आवरे गावात गेली 40 वर्ष चांगदेव हसुरांम ठाकूर हे स्मशानभूमीत क्रिया कर्म म्हणजे शेवटच्या क्षणा पर्यंत प्रेतची राख रूपांतर होत पर्यन्त कोणत्याही मानधनची अपेक्षा न करता केवळ सामाजिक कार्य म्हणून करत असत. हो संपुर्ण मानवजात मानवाची ही शेवटच्या यात्रेचे काम अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक या समाजात असतात त्या पैकी एक म्हणजे चांगदेव ठाकूर होय.
हे एक पवित्र कार्य आहे तसेच आवरे गाव व सभोवताली गावात कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम ,लग्नसमारंभ सत्यनारायण ची महापुजा , किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात सतत प्रकर्षाने उत्तम चवदार उत्कृष्ट असे भोजन करीत असत तसेच उत्तम कलाविष्कार म्हणून ढोलकी वादन सुद्धा करत म्हणजे याचा कलाविष्कार ते धार्मिक कार्यक्रम गणपती किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात दाखवत असत असत म्हणजे ही जीवनात विविध प्रकारच्या काळाची जोपासना करून आपल्या कुटुंबचा सुद्धा सांभाळ अतिशय सुरेख पणे करत जीवनाला आकार दिला व आपले कुटुंब सुद्धा सुशिक्षित करण्याचं श्रेय त्यांना जाते हो समाजात राहून खऱ्या अर्थाने आपल्या ह्या पवित्र कर्माने सामाजिक सेवा करणे हे त्याचं विशेष असा गुण होय आशा या थोर व्यक्तीच जाण हे प्रत्येकाला त्यांची कमतरता जाणवेल या भूमंडळाचे ठायी आपली विविध रंगी अशी भूमिका साकारून आपली exit घेतली आदरणीय चांगदेव हसुरांम ठाकूर यांच्या मृतात्म्य स ईश्वर चिरंतन शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना होय








Be First to Comment