Press "Enter" to skip to content

…आणी “ते” पुन्हा आले !

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निलेश सोनावणे यांची निवड तर सरचिटणीसपदी विशाल सावंत  

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सन २०२१-२०२२ करिता पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे .पनवेल तालुका पत्रकार संघर्ष  समितीच्या आज झालेल्या   मासिक बैठकीत समितीचे जेष्ठ सदस्य तथा सल्लागार माधव पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार  नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  

यामध्ये सरचिटणीचपदी माझं पनवेल चे संपादक विशाल सावंत , कार्याध्यक्षपदी दिशा चॅनलचे संपादक सुनील कटेकर, उपाध्यक्ष पदी रायगड पनवेल चे संपादक संतोष भगत,खजिनदार पदी हरेश साठे , सहचिटणीच पदी वचन गायकवाड , प्रसिद्धी प्रमुख पदी संतोष सुतार, सल्लागार पदी सिटी बेल चे समुह संपादक विवेक पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .तर सदस्य पदी वतन कर्नाळाचे संपादक भालचंद्र जुमलेदार , सिटी बेल चे समूह संपादक मंदार दोंदे ,नवराष्ट चे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे ,साईश्रद्धा न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी लक्ष्मीकांत ठाकूर ,मल्हार चॅनेलचे प्रतिनिधी प्रवीण मोहकर , दैनिक पुढारीचे प्रतिनिधी रवींद्र गायकवाड  यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे . 
 

निलेश सोनावणे यांनी  पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सन २०१९ -२०२० मध्ये अध्यक्ष पद भूषविले होते त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यावेळी अवघ्या ४ महिन्यात अनेक उपक्रम अभ्यास दौरे यशस्वी केले होते.

पत्रकारांच्या अनेक समस्या शासनापर्यंत पोचवण्याचे काम निलेश सोनावणे यांनी केले होते .निलेश सोनावणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चारच महिन्यात म्हणजेच मार्च २०२० मध्ये  लॉकडाऊन जाहीर  झाले त्यातही पत्रकारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवित सामाजिक उपक्रम हि राबविले . लॉक डाऊनमुळे कमी कार्य काळ त्यांना मिळाला होता .म्हणून आज झालेल्या मासिक बैठकीत पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी  निलेश सोनावणे  यांच्या  गळ्यात अध्यक्ष पदाची माळ टाकली .  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.