सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील मेहनती आणि कष्टकरी शेतकरी रामचंद्र शिवराम लोखंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समियी ते ७५ वर्षाचे होते.त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाचे तसेच परोपकारी व खांब देवकान्हे विभागात ते सर्वांनाच सुपरिचित परिचीत होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक शासकीय, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच कोलाड,खांब, देवकान्हे, धामणसई विभागातील दुःखी समाज बांधव उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, भाऊ , भावजया, पुतणे, सुना, नातवंडे व मोठा लोखंडे परिवार आहे तसेच पुढील दशक्रिया विधी बुधवार दि.१७ फेब्रुवारी व उत्तर कार्य विधी शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांच्या चिल्हे येथील राहत्या निवस्थांनी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे.








Be First to Comment