सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील मुठवली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व क्रुषीनिष्ठ शेतकरी तुकाराम नारायण कापसे यांचे सोम.दि.१ फेब्रु.२०२१ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्यांच्या दु:खद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्व.तुकाराम कापसे हे युवा सामाजिक कार्यकर्ते रमण कापसे यांचे वडील होत.
आयुष्यात शेती व्यवसायाला विशेष प्राधान्य देऊन क्रुषीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांनी विशेष ख्याती मिळविली होती.तर स्वतः अल्पशिक्षित होते तरीही शिक्षणाचे महत्त्व त्यांना चांगलेच ठाऊक असल्याने आपल्या मुलांना चांगले शिक्षित केले होते.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुन,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुध.दि.१० फ्रेब्रु.तर अंतिम धार्मिकविधी शुक्र.१२ फेब्रु.रोजी मुठवली निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment