बेलापूर गावातील ग्रामस्थ नवी मुंबई महानगर पालिकेमुळे आले रस्त्यावर !
नवी मुंबई महानगरपालिकेने जोर जबरदस्तीने पाडले बेलापूर गावातील सरकारी गाळे
सिटी बेल लाइव्ह । बेलापूर ।
सन १९९२ रोजी बेलापूर गावातील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना कडून अनामत रक्कम घेऊन २७ गाळे भाडे तत्वावर व्यवसायासाठी दिले होते आणि त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती . आणि त्यानंतर नवी मुंबई महानगर पालिकेने कुठेलेही हस्तांतरण न घेता भाडे वसुली सुरु केली, गेली कित्येक वर्षे बेलापूर ग्रामस्थ इमानी इतबारींनी ग्रामपंचायती नंतर नवी मुंबई महानगर पालिकेला भाडे भरत आहेत.
पण गेली २९ वर्षे ग्रामस्थांचे असलेले हे गाळे क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांना दरडावून पोलीस फौज फाट्यासह नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उध्वस्थ करून टाकले आणि शेकडो लोक रस्त्यावर आले.
गेली कित्येक वर्षे बेलापूर ग्रामस्थ इमानी इतबारींनी ग्रामपंचायती नंतर नवी मुंबई महानगर पालिकेला भाडे भरत असून त्याच्या रीतसर पावत्या नवी मुंबई महानगर पालिके कडून घेत होते. प्रशासनाने त्यांना भूल थापा देऊन मार्केट बांधून देण्याचे स्वप्न दाखवले, आणि वारंवार झालेल्या ग्रामस्थांच्या मिटिंग मध्ये गाळे तोडण्यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने ग्रामस्थांना पर्यायी जागी स्थलांतरित करून देऊ आणि त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे कबुल केले होते, तसेच १०० स्केवर फूट चे गाळे मोबदला म्हणून प्रत्येक भू धारकाला देण्याचे कबुल केले होते, पण क्रूर सरकारी अधिकाऱ्यांनी पुढचा मागचा विचार न करता सगळे गाळे भस्मसात करून टाकले आणि होत्याच नव्हतं करून टाकलं.
आता बेलापूर गावातील बाया बापड्यानी कमावलेली त्यांची ३० वर्षातली कमाई धुळीस मिळाली आहे आणि पुन्हा एकदा माणुसकीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. आता अशा पीडित नागरिकांनी कुठे ज्याचे असा अनुत्तरित प्रश्न उभा राहिला आहे.
आणि पुन्हा एकदा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हि म्हणण्याची वेळ आली आहे !
अशा अमानुष राजकीय आणि प्रशासनिक शक्तीचा वापर करून असे अशोभनीय क्रूर कृत्य करून सामान्य माणसांच्या जीवनावर नांगर फिरवला गेला आहे. आज शेकडो लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे आणि उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, यातून भविष्यात काही अघटित घडले तर त्याला संपूर्णपणे प्रशासनाचं जबाबदार असेल असा संताप बेलापूर गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केले.
तसेच हे कारस्थान रचण्या मागे तथाकथित काही राजकीय व्यक्ती, प्रशासनिक अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याचा संशय गावातील काही ग्रामस्थांनी व्यक्त केला. कारण ह्यात करोडो रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, कारण ह्यात काही मंडळींचा स्वार्थ हेतू दडलेला आहे अशी हि भावना व्यक्त केली जात आहे.
गावातील काही व्यक्तींनी हे हि दर्शवले कि अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे तशीच कायम करून अधिकृत बांधकामे तोडून सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय व्यक्तींना खुश करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे.
हि घटना वाऱ्या सारखी पसरताच विविध सामाजिक संघटनांनी हि ह्याचा निषेध व्यक्त केला आहे आणि ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला आहे.
ह्या संपूर्ण घटनेचा आधार घेऊन बेलापूर गावातील ग्रामस्थांनी न्यायालयाकडे तसेच मुख्यमंत्री कार्यालय धाव घेतली आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
ग्रामस्थांनी, ह्या घटनेचा निषेध व्यक्त करत राळेगण सिद्धीला जाऊन जेष्ठ समाज सेवक आणि गरिबांचे कैवारी अण्णा हजारे यांच्या उपोषण स्थळाला भेट देऊन सर्व घटनेची माहिती देणार आहेत.
त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन, प्रशासनाला निवेदन करून ४८ तासाच्या आत प्रशासनाने लिखित स्वरूपात प्रत्येक भू धारकाला त्याचा अधिकार देण्याची विनंती केली आहे, आणि तसे जर घडत नसेल तर ह्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा पीडित ग्रामस्थांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.








Be First to Comment