सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल ।
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानामुळेच आज आपण सर्व भारतीय नागरीक गुण्या गोविंदाने नांदतो आहोत. आपण प्रगती करीत आहोत. त्यामुळे या संविधानाचे पालन आणि रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.’ असे उद् गार नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी काढले. ते नवीन पनवेल सेक्टर ०९ येथील आम्रपाली बुध्द विहारात साजरा करण्यात आलेल्या ७१ व्या प्रजासत्ताकदिनी बोलत होते.
ते पुढे म्हणाले,’ हा प्रजासत्ताकदिन साजरा करतांना विद्यमान केंद्र सरकारचे असे आदेश आहेत कि, प्रजासत्ताकदिन साजरा करतांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व भारतीय संविधानाची प्रत यांचे पूजन करुनच साजरा करावा. यापुर्वी साजरे झालेले प्रजासत्ताकदिन हे फक्त तिरंगा फडकवूनच साजरे केले जात होते. त्यामुळे विद्यमान केंद्र सरकारने विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणखीन सन्मान वाढविलेला आहे. ही बाब आपण सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे!’ असे प्रतिपादन करुन त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गणेश भंडारे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. मोहन कंठे, अशोक मिसाळ, सुभाष कांबळे, सुरेश सोंडे, बापूसाहेब कांबळे, सुजित खंडीझोड, प्रकाश सोनावणे आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शेवटी ज्येष्ठ पत्रकार श्याम साळवी यांनी आभार मानले.








Be First to Comment