सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
यंदाचा प्रजासत्ताक दिन भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ
सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी संकलनाचे प्रमुख राजीव बोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.देशाप्रती आपल्या मानवंदना अर्पण करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे मा.कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. माझा प्रभाग माझी जवाबदारी व ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या अनुषंगाने काम करणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रभागा मध्ये उत्तम प्रकारे विकासकामे केली आहेत आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते जी तत्परता दाखवतात त्याबद्दल नागरिकांनी त्यांना जाहीर धन्यवाद दिले.

यावेळी विशेष आकर्षणाचे केंद्र होते विक्रांत पाटील यांनी खास मध्यप्रदेशहुन तयार करून घेतलेली भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती.या कार्यक्रमाला
श्रीराम मंदिर समर्पण निधी संकलन सहप्रमुख गौरव जोशी, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी,मा. नगरसेविका सौ नीता माळी आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने. उपस्थित होते








Be First to Comment