सिटी बेल लाइव्ह । मुंबई । किशोर गावडे /पंकजकुमार पाटील ।
मुंबई पूर्व उपनगरातील ज्ञान प्रसारक शिक्षण मंडळाचे संस्थापक संचालक व संदेश कॉलेजचे माजी मुख्याध्यापक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब म्हात्रे यांचे काल राहत्या घरी हृदय
विकाराच्या झटक्याने निधन झाले.
बाळासाहेब म्हात्रे हे विक्रोळीतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे ,असा मोठा परिवार आहे . सर्व पक्षांसोबत त्यांचें ऋणानुबंध कायमच राहिले. विक्रोळीतील एका कुशल शैक्षणिक कार्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून गोरगरिबांना माफक दरात शिक्षणाची सोय करणारी व्यक्ती होती.
त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी कला, क्रिडा, शैक्षणिक, राजकीय, व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर मान्यवर व्यक्तिनी भावपूर्ण आदरांजली वाहिली व म्हात्रे कुटुंबातील सदस्यांचे सान्तवन केले. बाळासाहेब म्हात्रे यांनी विक्रोळी टागोर नगरात संदेश कॉलेजची स्थापना करून मुलांच्या शिक्षणाची सोय केली.बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक विद्यार्थ्यीवर शोककळा पसरली होती.








Be First to Comment