Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिकेत लागणार प्रबोधनकार ठाकरे,बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमा

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पनवेल महानगरपालिकेत महाराष्ट्राचे थोर महापुरुष आदरणीय प्रबोधनकारक आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत. आज जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या नेतृत्वाखाली या प्रतिमा पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

नुकतीच महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असा ठराव मंजूर करण्यात आला कि थोर महापुरुषांच्या यादीमध्ये आदरणीय प्रबोधनकार ठाकरे आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावांचा समावेश करण्यात आला याची सुरुवात पनवेल महानगरपालिका सभागृहात फोटो प्रतिमा लावून व्हावी याचे कारण आदरणीय प्रबोधनकार ठाकरे हे काही काळ पनवेल येथे राहत होते. त्यामुळे पनवेल महानगर पालिका शासकीय कार्यालयात आदरणीय प्रबोधनकार ठाकरे आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची फोटो प्रतिमा प्रथम पनवेल महानगर पालिका कार्यालयात लावण्यात यावे अशी विनंती रायगड जिल्हा प्रमुख  शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

त्या प्रसंगी पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, शहरप्रमुख अच्युत मनोरे, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, नवीन पनवेल शहर प्रमुख रुपेश ठोंबरे, शहरसंघटक प्रवीण जाधव, उपशहरप्रमुख अतुल पलण, राजेंद्र भगत, युवासेनेचे विधानसभा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडीच्या तालुका संघटक सौ. प्रमिला कुरघोडे, शहरसंपर्क संघटक रुही सुर्वे,  शहर संघटक सौ.अर्चना कुळकर्णी, उपशहरसंघटक उज्वला गावडे, युवा सेना अधिकारी अमोल गोवारी, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे, अ‍ॅड.अमर पटवर्धन, शाखा प्रमुख अलकेश जाधव, अभिजीत साखरे, नुर वाईकर, चंद्रकांत शिर्के, उपविभाग संघटक जुनेद पवार आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.