सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी गावच्या रहिवासी असणाऱ्या श्रीमती सुलोचना पांडुरंग बामणे यांचे गुरू. दि.१४ जाने.रोजी वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले.
सुलोचना बामणे या अतिशय शांत व विनम्र स्वभावाच्या होत्या. तसेच सामाजिक बांधिलकीचे जाणिवेतून गावातील प्रत्येक घरातील सर्वच उपक्रमात नेहमी सक्रीय सहभागी असायच्या.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत समजताच विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, त्यांचे आप्तस्वकीय व मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शनि.दि.२३ जाने.तर अंतिम धार्मिकविधी सोम.दि.२५ जाने. रोजी तळवली तर्फे अष्टमी येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment