Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी

डोंगरगाव येथे वृक्षारोपण, लसीकरण, कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

तहसिलदार जिवराज डापकर व न्यायाधीश जे. डी. जाधव यांची उपस्थिती

सिटी बेल | हदगाव | राहुल बहादूरे |

हदगाव पासून तिनं किलोमीटर अंतरावर माळरानावर पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या माता जगदंबा यांच्या पावन भूमीत तालुक्यासह आजुबाजूच्या परिसरात सर्व परीचीत असलेले मौजे डोंगरगाव येथे १२ ऑक्टोंबर रोजी डॉ. भगवान निळे यांच्या आयोजनाने व गावकऱ्यांच्या मदतीने नवरात्र उत्सवानिमित्त निसर्ग रम्य आवारात जिवनांकुर सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून घनवन पध्दतीने पाचशे वृक्ष लागवड, लसीकरण मोहीम, हदगाव तालुका न्यायालयाचे न्यायाधीश व सर्व सहकारी यांच्याकडून कायदेविषयक मार्गदर्शन व विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव व बाल युवक गजानन भारुडी भजनी मंडळ बरडशेवाळा यांनी गावातुन वृक्ष दिंडी च्या माध्यमातून जनजागृती केली. मंदिर परीसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण लसीकरण विविध कार्यक्रमांचे उदघाटन हदगाव चे तहसिलदार जिवराज डापकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी तहसीलदार जिवराज डापकर, हदगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री जे. डी. जाधव व सर्व सहकारी वर्ग, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, पंचायत समिती सदस्य लताताई निळे, सरपंच निळे, ग्रामसेवक एल. एस.सावतकर, जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे संस्थापक हरीचंद्र चिल्लोरे, वनविभागाचे कावळे मडम, हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनुप सारडा, ग्रावातील प्रतीष्ठीत नागरिक डोंगरगाव सह आजुबाजुच्या परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.