आकाशवाणी,मुंबई येथे अनेक वर्षे कार्यरत असलेले अधिकारी व ज्येष्ठ नाट्य, सिने पत्रकार दीनानाथ घारपुरे यांचे दुःखद निधन !
सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / मुंबई ###
आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी दीनानाथ घारपुरे यांचे काल बुधवारी दुपारी गिरगाव मुंबई येथे ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहेत.
दोन दिवस, अस्वस्थ वाटत असल्याने ते घरीच होते.
घारपुरे यांनी मुंबई,पुणे,नाशिक, जाहिरात प्रसारण सेवा आदी केंद्रांवर काम केले. कष्टाळू प्रामाणिक अधिकारी म्हणून ते सहकारी आणि श्रोत्यांमधेही प्रिय होते.अनेक वर्षे त्यांनी मराठी नाटकांची परीक्षणे केली व स्पर्धा परीक्षक म्हणूनही काम पाहिले. आकाशवाणीच्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी सोशल मिडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.
तसेच
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !देताना एनयुजे अध्यक्ष शितल करदेकर म्हणाल्या एक चांगला माणूस आज आपल्यातून गेला! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! त्यांच्या परिवाराच्या दुःखात एनयुजेमहाराष्ट्र परिवार सहभागी आहे!
तसेच सर्व राज्य,जिल्हा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सभासद। नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.
Be First to Comment