
कॅनरा बँकेच्या माध्यमातून नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा – मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार
पेण, ता. ३० (वार्ताहर): १९०६ साली स्थापन होऊन ११८ वर्षींची परंपरा लाभलेली आणि ९ हजार ८०० हून अधिक शाखा असणारी देशभरातील एकमेव कॅनरा बँक आज पेणमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी आली असताना येथील नागरिकांनी कॅनरा बँकेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे मुख्य महाप्रबंधक रणजीव कुमार यांनी पेण येथे बोलताना केले.
पेण येथील बाजार समिती समोरील इमारतीत कॅनरा बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार, पेण माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपमहाप्रबंधक रजनिश कुमार, दिपक सक्सेना, सहायक महाप्रबंधक शंकर एस.राव, शाखा प्रबंधक आनंदराव पालवे, जागेचे मालक गौतम पाटील, राजश्री पाटील, दर्शन बाफना, रवींद्र म्हात्रे, यांच्यासह तालुक्यातील व्यापारी, उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे ते म्हणाले बँकेची २६ लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असून बँकेमार्फत पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला, विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून योग्य सुविधा पुरवण्याचे काम आमचे अधिकारी, कर्मचारी करतील असेही त्यांनी शेवटी सांगितले.तर पेण ही तिसरी मुंबई म्हणून ओळख होत असताना आपण योग्य वेळी कॅनरा बँकेची शाखा येथे आणले आहे येणाऱ्या काळात या परिसराचा विकास अधिक जोमाने होऊन या विभागाचा आर्थिक विकास सुद्धा वाढणार आहे.त्यामुळे कॅनरा बँकेची सुद्धा येथे भरभराटी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आले.




Be First to Comment