
दिघोडे येथील अवनी कोळी हिची नेत्रदीपक कामगिरी: आशियाई शूटिंग स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ मेडल
तृप्ती भोईर : उरण
आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी दिघोडे गावातील सुकन्या कु. अवनी अलंकार कोळी हिने कझाकीस्तान येथे झालेल्या आशियाई शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावून राष्ट्रीय क्रीडा दिनी आपल्या देशाचं, गावाच नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे.त्यामुळे कु. अवनी कोळी हिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.दिघोडे गावचे माजी सरपंच अविनाश पाटील, सरपंच किर्तीनीधी ठाकूर यांनी अवनी अलंकार कोळी हिचे अभिनंदन केले आहे.
१६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान कझाकीस्तान येथे संपन्न झालेल्या १६ व्या आशियाई शूटिंग रायफल शॉटगन डबल ट्रॅप जु. वूमन स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत अवनी अलंकार कोळी रा. दिघोडे तालुका उरण जि. रायगड ची कन्या हिस वयक्तिक ब्रॉन्झ मेडल व सांघिक सिल्वर मेडल हे स्मिता सावंत (महाराष्ट्र )व कृषिका जोशी (गुजरात )ह्यांच्या त्रिकुटास भारतीय संघाला प्रदान करण्यात आले, अवनीने तिच्या ह्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेत दुहेरी पदक मिळवत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

तिच्या ह्या यशाबद्दल सिद्धांत रायफल व पिस्टल शूटिंग क्लब चे अध्यक्ष विजय खारकर, सेक्रेटरी/प्रशिक्षक किशन खारके,सदस्य महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर,प्रशिक्षक व राष्ट्रीय नेमबाज अलंकार कोळी, अवनीचे शूटिंग चे प्रशिक्षक शॉटगन – ट्रॅप आणि डबल ट्रॅप प्रशिक्षक – महाराष्ट्र – आयएसएसएफ परवाना सी धारक.राल्स्टन कोयलो, वीर वाजेकर कॉलेज फुंडे प्रिंसिपल व मित्र परिवार ह्यांनी तिच्या ह्या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच दिघोडे गावचे सरपंच किर्तीनीधी ठाकूर,दिघोडे गावातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांनी अवनी कोळी हिच्या यशाबद्दल अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अवनीचे हे यश तिच्या आई वडिलांसाठी फार अभिमानास्पद आहे.




Be First to Comment