
मान्यवरांच्या हस्ते सिटी बेलच्या गणेशोत्सव विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
नवनवीन विषयांना गवसणी घालत वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक प्रसिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सिटी बेल इंग्रजी नियतकालिकाच्या गणेशोत्सव विशेषांकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते गणेशोत्सव विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन संपन्न झाले.
यंदाचे वर्षी गणेशोत्सव विशेष अंकासाठी “लॉर्ड गणेशा बियाँड दि बॉन्ड्रिज” अशी थीम घेण्यात आली आहे.भारत देशाबाहेर असणारी गणेश मंदिरे, सुप्रसिद्ध गणेश मूर्ती,दुर्मिळ गणेश स्थाने,विविध देशात गणेशाचे होणारे पूजन अशा वैविध्यपूर्ण लेखांचा धांडोळा या विशेषांकात घेण्यात आला आहे.या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवणारे लालबागचा राजा मित्र मंडळाचा इतिहास देखील या विशेष अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विशेष अंकाच्या संकल्पनेचे आणि त्यामध्ये अंतर्भूत केलेल्या लेखांचे मनापासून कौतुक केले. तसेच सिटीबेल सातत्याने अत्यंत वाचनीय अंक प्रसिद्ध करत असल्याबद्दल संपादक द्वयींचे अभिनंदन केले. पत्रकार विवेक पाटील आणि पत्रकार मंदार दोंदे यांच्या कन्या देखील सिटीबेल या नियतकालिकामध्ये कार्यरत झाल्या असल्याबद्दल त्यांनी सिटीबल वृत्त समूहाचे विशेष कौतुक केले.
महेंद्र घरत यांनी प्रकाशन करताना सिटी बेल कायमच उत्तम दर्जाचे आणि उत्तम वाचनगुण असलेले साहित्य प्रकाशित करत असल्याबद्दल विवेक पाटील आणि मंदार दोंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.ते पुढे म्हणाले की “लॉर्ड गणेशा बियाँड दि बॉन्ड्रिज” हा अंक अत्यंत दर्जेदार झालेला असून इंटरनॅशनल गणेशस्थानांची महती आणि माहिती या अंकात वाचायला मिळणार आहे.
मॅक्झिन स्वरूपातील हा २० पानी संपूर्ण रंगीत अंक डिजिटल स्वरूपात देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.




Be First to Comment