
खोटा मालक उभा करून खरेदीखत ; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पेण, दि. 25 (प्रतिनिधी) :- पेण तालुक्यातील मौजे बोरगाव हद्दीतील सर्वे नंबर 196 या जागेचे मुळ मालक यांचे मृत्यू झाले असतानाही त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून खोटा खरेदीखत (दस्तऐवज) केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटना कार्याध्यक्ष, राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना रायगड जिल्हाध्यक्ष आणि साप्ताहिक राजयोद्धा संपादक महेश पोरे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बोरगाव हद्दीमधील सर्वे नंबर 196 या जागेचे मूळ मालक यशवंत महादेव टिळक यांचे दिनांक 30 डिसेंबर 2018 रोजी मृत्यू झाले असून त्यांचे नांवे असणारी मौजे बोरगाव येथील जमीन मुलगा प्रशांत टिळक व त्यांच्या नातेवाईकांनी विक्री करताना मयत वडिलांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून दस्त क्रमांक 2764/ 2018 आणि नोंदनी दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी खरेदीखत (दस्तऐवज) करून घेतला आहे.तसेच यातील काही शेतजमीन जवळपास तेरा परप्रांतीयांना सुद्धा विक्री केल्याचे निदर्शनात आले आहे.त्यामुळे जमिनीचे मूळ मालक यांचा मृत्यू होऊनही दीड दोन महिन्यांनी मयत व्यक्तीच्या नावे दुसरा व्यक्ती उभा करून खोटा खरेदीखत करत शासनाची दिशाभूल तसेच फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी दिनांक 9 जुलै 2025 रोजी करण्यात आली आहे.त्यामुळे संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करणार असल्याचे महेश पोरे यांनी सांगितले आहे.
या प्रकरणामधील तक्रार आमच्याकडे आली असता आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवली असून या तक्रारीत जवळपास 55 लोकांना नोटीसा सुद्धा पाठविण्यात येऊन त्यांचे म्हणणे मागवले परंतु यातील काहींचे पत्ते न मिळाल्याने नोटीसा परत आल्या आहेत.त्यामुळे याबबात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यावर संबंधितांवर तीन-चार दिवसात तक्रार दाखल करण्यात येईल.
– वैशाली म्हात्रे, दुय्यम निबंधक अधिकारी पेण




Be First to Comment