
शेतकरी कामगार पक्ष सोशल मीडिया प्रमुख म्हणून श्री. अजय काशिनाथ फडके यांची निवड करण्यात आली. पदाधिकारी पद नियुक्ती सोहळ्यात त्यांना माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी शेकाप चे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, प्रकाश म्हात्रे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
अजय फडके हे शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामीण भागातील एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. शेकडो तरुणांशी त्यांचा संपर्क असतो. सोशल मीडियावर त्यांचा लोकांशी दांडगा संवाद सुरू असतो. आजचा युग पाहता पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी या समाज माध्यमाचा उपयोग करणे आवश्यक असल्याने पक्षाने ही जबाबदारी अजय फडके यांना दिली आहे. आपल्यावर विश्वास दाखवून मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण ताकदीने स्वीकारली असल्याचे अजय फडके यांनी यावेळी सांगितले.




Be First to Comment