

मा. नगरसेवक तथा भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानघर येथील करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस येथे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस (ओबीसी मोर्चा) प्रसाद म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी भाजपा सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र सोनवणे, चंद्रकांत पंडित सर, युवा मोर्चा सदस्य सद्दाम बागवान, रोहित म्हात्रे, अजय बलखंडे, माजीद बागवान, संतोष वर्तले, शुभम बेद, अमन बेद, आदित्य गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.




Be First to Comment