
विजेत्यांना २५ हजार रुपयांची बक्षिसे तसेच आकर्षक चषक व प्रमाणपत्र
पनवेल (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्यावतीने ‘गणपती सजावट स्पर्धा २०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना २५ हजार रुपयांची बक्षिसे तसेच आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धक हा पनवेल शहरातील रहिवासी असणे बंधनकारक असेल, तसेच थर्माकोल वापर केलेली सजावट स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८४३३५१३५४० या क्रमांकावर घरातील श्रीगणेशाचे व सजावटीचे फोटो व्हाट्सअँप करावे त्यासाठी अंतिम नोंदणीची अंतिम तारीख २८ ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी कोमल कोळी ९८२०८९८८०६, शुभम कांबळे ९८६७५४७१३४, अनिमेश पटवर्धन ९०२९०८५००८ किंवा स्वरूप मुंबईकर ७५०६६३७४३७ यांच्याशी संपर्क साधावा.




Be First to Comment