
जिल्हा उद्योग केंद्र रायगड- अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने वृक्षारोपण संपन्न
पनवेल दि.२३(संजय कदम): जिल्हा उद्योग केंद्र रायगड – अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने आज वृक्षारोपण रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांत अधिकारी पवन चांडक, तहसीलदार विजय पाटील, पनवेल महापालिकेचे उपयुक्त वैभव विधाते, पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेडचे चेअरमन. विजय लोखंडे, उपाध्यक्ष सुवर्णा पुराणिक, संचालक विजय देशमुख, सुनील सुचक, दीप लोखंडे, श्रीजय सुरतकल, ममता त्यागी, व्यवस्थापक दत्तकुमार सावंत, सदस्य. स्वर्णपाल सिंग कोहली, फतेहलाल जैन, अभिषेक धोंड, कृतार्थ पटेल, मंदार पोदार, आदेश कोठारी, कल्पना लोखंडे, सिद्धी लोखंडे उपस्थित होते. यावेळी जिल्हा धिकारी किशन जावळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून वृक्ष रोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन ही करा असा संदेश दिला. त्यानंतर त्यांनी पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेडचे चेअरमन विजय लोखंडे यांच्या कारखान्याची पाहणी केली.




Be First to Comment