
म्हसळा येथे खैर चोरी पकडताना वन समिती अध्यक्षाच्या अंगावर घातली गाडी
mhasala : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात खैर चोरी करताना रात्रीचा थरारक प्रकार घडला असून वन विभागाने जप्त केलेल्या गाड्या पुन्हा चोरून नेहताना चक्क वन समिती अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या अंगावर चार ते पाच चोरांनी मिळून गाडी घातल्याचा प्रकार घडला आहे.
गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्याच्या सुमारास काही अज्ञात लोक म्हसळा तालुक्यातील ताम्हाणे शिर्के येथील जंगलात खैर जातीचा झाड तोडत असल्याची खबर शिर्के यांनी वन खात्याला दिली. यावेळी सहाय्यक वन सौरक्षक चौबे व त्यांच्या टीम ने धाड टाकली असता आरोपी घटना स्थळावरून आपल्या सोबत आणलेल्या 4 गाड्या व छाटलेलं खैर ठेऊन पसार झाले.मात्र वन विभागातील कर्मचाऱ्यांनी नामी शक्कल लढवत गाड्यांच्या टायर ची हवा सोडून जप्त केलेल्या गाड्या घटनास्थळी ठेऊन निघून गेले.वन विभागाच्या चुकी मुळे रात्रीच्या वेळेस चोरांना पुन्हा संधी मिळाली असून जप्त केलेल्या आपल्या गाड्या पुन्हा चोरून घेऊन जाताना त्यांना शिर्के यांनी पकडले. मात्र चार पैकी दोन गाड्या घेऊन पसार होण्यास आरोपीना यश आले.
तालुक्यातील खैर चोरी करणार्यांना मदत करण्यात म्हसळा वनविभागा चा मोलाचा वाटा असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख तथा वन समिती अध्यक्ष नंदू शिर्के यांनी केला.




Be First to Comment