Press "Enter" to skip to content

जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज ३ जनसुनावणी यशस्वी

कंपनीच्या या विस्तारीकरणाला हजारों नागरीकांडून हिरवा कंदील

पेण, दिनांक २३ ( प्रतिनिधी ) -: पेण तालुक्यातील वडखळ- डोलवी परिसरात असणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज ३ च्या विस्तारीकरणासाठी दि. २२ रोजी जेएसडब्ल्यू जेटी वाहनतळ, धरमतर पोलीस चौकी जवळ जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते.ही जनसुनावणी यशस्वीरित्या पार पडून कंपनीच्या या विस्तारीकरणाला हजारों नागरीकांडून हिरवा कंदील देण्यात आला आहे.

सदर जनसुनावणी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऋतुजा भालेराव, पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.दुपारच्या दरम्यान सुरू झालेल्या कंपनीच्या जनसुनावणीत कंपनीच्या अधिकारी वर्गातील ज्योतींद्र देशमुख व विवेक कुलकर्णी यांनी कंपनीच्या विस्तारीकरणासह प्रदूषणासंदर्भात कंपनीने आजतागायत केलेल्या पेण, नागोठणे, अलिबाग या भागातील विकासकामांबाबत तसेच येणाऱ्या नियोजनाबाबत कंपनीच्या वतीने जनसुनावणी दरम्यान उपस्थित जनतेसमोर अहवाल मांडला व होत असलेल्या विस्तारीकरणात सदर कंपनी येथील भागांमध्ये अधिकाधिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.त्यानंतर सुनावणीसाठी आलेल्या लोकांकडून मत मांडण्यात सुरुवात झाली त्यावेळी या परिसरातील उपस्थित आजी, माजी सरपंच उपसरपंच, स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी यांनी येणाऱ्या प्रकल्पाचे स्वागत करून प्रकल्प वाढला तरच येथील रोजगार वाढणार आहे. आजपर्यंत कंपनीने या भागासाठी चांगल्या सुविधा दिल्या असून या जनसुनावणीला जाहीर पाठिंबा असल्याचे दर्शविले आहे.


यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, नंदा म्हात्रे, कुंदा गावंड, संतोष ठाकूर, चैतन्य पाटील यांच्यासह काही नागरिकांनी आपल्या हरकती नोंदविल्या असता यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु यावेळी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून ज्यांना हरकती नोंदवायच्या आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे सोमवार मंगळवारी लेखी स्वरूपात मान्य मांडावे असे आव्हान करून जनसुनावणी यशस्वीरित्या पार पाडली. या जनसुनावणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घड नये याकरिता पेण डीवायएसपी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी पोलीस निरीक्षक संजीवकुमार ब्राह्मणे यांच्याकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.