
रायगड प्रतिनिधी : याकूब सय्यद
सालाबाद प्रमाणे याही वर्षी “गौराई माझी” हा कार्यक्रम मुंबई मुलुंड पश्चिम येथे आयोजक संस्थापक सौ.रोहिणी जाधव यांनी बिग फाउंडेशनसंस्थेच्या वतीने दिनांक २०/०८ २०२५ रोजी ठीक दुपारी ०३ ते संध्याकाळी ०५ पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.
श्रावण आणि भाद्रपट हे दोन महिने गृहणीसाठी अतिशय आनंदाचे असतात श्रावणात रक्षाबंधन पोळा हरतालिका असे सण येतात तर पाठोपाठ भाद्रपट महिना गणेशाला घेऊन येतो प्रतिवर्षी या गणेशा पाठोपाठ ज्येष्ठा गौरीचे ही आणि अवघे घर या गौरी गणपतीच्या या मंगल आगमनाने हर्षभरी घेऊन जाते.
ज्येष्ठा गौरी हा महिलेचा अतिशय आवडता सण या दिवशी गौरी माहेरी येतात गौरी म्हणजे पार्वती गौरी म्हणजे साक्षात महालक्ष्मीचे रूप गणेशा पाठोपाठ येणारी गौरी म्हणजे गणेशाची आई पार्वती कोणी त्याला गणपतीची बहीण तर कोणी त्याला गणपतीची पत्नी असे म्हणतात नाते काही असले तरी गौरीही माहेरवाशीण या गोष्टीबद्दल सगळ्यांचेच एकमत असते.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना विरंगुळा म्हणून बी इन ग्रुप फाउंडेशन संस्थापक सौ. रोहिणी जाधव यांनी यावर्षी महिलांसाठी मंगळागौरी उत्सवाचे आयोजन केले होते.
गौराई माझी या कार्यक्रमात अनेक महिलांनी उत्साहित होऊन सहभाग नोंदवला होता महिलांनी या कार्यक्रमात गाणी नृत्य याचा मनसोक्त आनंद लुटला महिलांकरिता विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गौराई माझी २०२५ या कार्यक्रमांमध्ये ज्या महिलांनी आवर्जून स्पर्धेत भाग घेतला होता त्यापैकी वंदना पाचारणे मंगला पवार यांना उत्कृष्ट वेशभूषा तसेच वैशाली पवार यांना उत्कृष्ट नृत्य सादरीकरण केल्याबद्दल सन्मान चिन्ह देण्यात आले तसेच लता खराडे चित्रा मोरे योगिता गायकवाड निकिता म्हात्रे दीपिका झुंजारराव प्रीती सिंग ललिता सोरटे कामिनी देशमुख रेश्मा बोडारे व वंदना असे अनेक महिलांनी विविध मंगळागौर खेळामध्ये उत्साहीत होऊन आवर्जून सहभाग घेतल्याने त्यांना बी इन फाउंडेशन संस्थापक सौ. रोहिणी जाधव यांच्या शुभ हस्ते पारितोषिक सन्मानचिन्ह तसेच भेटवस्तू देण्यात आले.




Be First to Comment