
खोपोली : प्रतिनिधी
कुठेही आणि कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास हेल्प फाउंडेशनची टीम त्या ठिकाणी तत्काळ धावून जाते आणि मदतकार्य करते असते. या बाबीचा आढावा घेऊन आणि कामगिरीत सातत्य असावे या दृष्टिकोनातून मदत कार्यात आवश्यक असलेल्या संसाधनांची गरज ओळखून जे एस डब्ल्यू खोपोली या कंपनीने मदतीचा हात पुढे केला.
जे एस डब्ल्यू कंपनीचे प्लांट हेड राहुल महाकाल यांनी हेल्प फाउंडेशनच्या प्रतिनिधींकडे वॉटर रेस्क्यूसाठी आवश्यक असलेले साहित्य सुपूर्द केले. त्यावेळी एच. आर. जनरल मॅनेजर अनिल महाजन, डेप्युटी मॅनेजर अतुल शिंदे, सिनियर इंजिनिअर प्रवीण तावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम आणि हनीफ कर्जीकर यांचे कडून संस्थेच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेत शाबासकीची थाप दिली. भविष्यात या अतुलनीय सामाजिक उपक्रमास आवश्यक असलेली अत्याधुनिक संसाधने पुरवण्याचा संकल्प जाहीर करत शुभेच्छा दिल्या.




Be First to Comment