
अल्पवयीन मुलाचे चार वर्षीय मुलीबरोबर लैंगिक चाळे ; आरोपीस अटक
पेण, दि. १८ (वार्ताहर) : पेण शहरातील कोंबडपाडा चावडीनाका येथे राहणाऱ्यांना एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून त्याच्याच नात्यातील चार वर्षीय लहान मुलीबरोबर त्याने लैंगिक चाळे केल्या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील कोंबडपाडा, चावडीनाका येथील एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच नात्यातील पिडीत चार वर्षीय लहान मुलगी तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे लैंगिक चाळे तिच्या बरोबर काही दिवस करत असल्याने तेथील फिर्यादी याने याची तक्रार पेण पोलीस ठाण्यात दि. १५ ऑगस्ट रोजी केली असता सदर मुलास पोलीसांनी अटक केली असून त्यास बाळ न्याय मंडळ कर्जत येथे रवानगी केली आहे.त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), (आय), (एम) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम (४) (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर या करत आहेत.




Be First to Comment