Press "Enter" to skip to content

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे वनवासी विद्यार्थांची आरोग्य तपासणी


पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत गेली ३५ वर्षे सातत्याने वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थी आरोग्य दत्तक योजना राबविली जात आहे त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर, मोफत औषधे वाटप, खाऊ वाटप, आणि तेथील १० वी च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे Ideal Study App चे वाटप करण्यात आले.

उपक्रमामध्ये रोटरी ची जुनी theme “Spreading Happiness” याचा प्रत्यय आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आंनद खरोखर साठवून ठेवण्या सारखा होता. प्रोजेक्ट चेअरमन डॉ. रमेश पटेल यांनी हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली तसेच अल्पोपहाराची खूप छान सोय केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. डॉ. तुषार जोशी, डॉ.चंद्रात्रे, डॉ. मिलिंद घरत यांनी विध्यार्थ्यांची तपासणी करून प्रोजेक्ट यशस्वी करण्यात मोठा हातभार लावला. फार्मासिस्ट अँन लीना घोडिंदे यांनी रो. मनोज आंग्रे यांच्या सहकार्याने औषधे वाटप करण्याची जबाबदारी छान पणे पार पाडली. बी जी पाटील यांनी या प्रोजेक्ट बद्दल उपस्थितीताना माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. PP संतोष घोडिंदे यांनी आपल्या जुन्या आठवणी ना उजाळा दिला. अँनस यांनी खाऊ वाटपाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. दीपक गडगे आणि डॉ. मिलिंद घरत यांच्या हस्ते अँपचे वाटप करण्यात आले.

रो .सुदीप गायकवाड रो .ऋषिकेश धुंदरे, रो .ऋषिकेश जोशीरो. गजानन जोशी, रो .विकेश कांडपिळे, रो.कचरे, सार्जंट योगेश महाजन यांना दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडली आणि नेहमीप्रमाणेच या शिबिराचे सुयोग्य नियोजन PP डॉ. लक्ष्मण आवटे यांनी केले. या प्रसंगी अध्यक्ष अनिल ठकेकर, सचिव अतिश थोरात, नियोजित अध्यक्ष दीपक गडगे यांचे सह अनेक अँन्स, अनेटस तसेच वनवासी आश्रम कार्यकर्ते श्री. गाडगीळ हे उपस्थित होते. आजच्या सर्व सदस्यांच्या लक्षवेधक उपस्थितीने “Unite For Good “ही या रोटरी वर्षाच्या Theme चा पुनप्रत्यय आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.