
येणारा प्रकल्प आरोग्यास हानिकारक नाही – माजी सरपंच राजेश मोकल
पेण, दि. २० ( प्रतिनिधी ) -: पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज 3 च्या विस्तारीकरणासाठी 22 ऑगस्ट रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे त्या जनसुनावणीला वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल, डोलवीचे उद्योजक अनिल म्हात्रे, गडबचे उद्योजक तुलशिदास कोठेकर तसेच माजी सरपंच मनोहर कोळी ग्रामपंचायत माजी सदस्य धनाजी नाईक, महेश म्हात्रे, विजय गायकवाड यांच्यासह असंख्य नागरीकांचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले.
तालुक्यातील वडखळ विभागात जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून आजपर्यंत हजारों युवकांना रोजगार मिळाला आहे.अनेक ठिकाणी कंपनीद्वारे विकासात्मक कामे होत आहेत तसेच सर्वात मोठी असणारी वडखळ बाजारपेठ येथे कंपनीमुळेच मोठी उलाढाल होत असून यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे.अशा अनेक चांगल्या गोष्टी असतांनाही काहीजण विनाकारण विरोध दर्शवित आहेत की येणाऱ्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणामुळे येथे अनेक आजार उद्भवणार आहेत परंतु ते लोक विनाकारण नागरीकांची दिशाभूल करत आहेत उलट या आगोदर अनेक वर्षे कंपनीत काढले परंतु आजतागायत कोणताही प्रकारचा आरोग्यास धोका निर्माण झाला नाही कंपनीने याकरीता येथे हॉस्पिटलची उभारणी केली आहे ती अधिक प्रभावी करावी यासाठी आम्ही कंपनीकडे मागणी करणार आहोत.उगाचच लोकांची दिशाभूल करु नये सदर कंपनीच्या माध्यमातून येणारा फेज 3 हा प्रकल्प या भागाच्या विकासासाठी अधिक महत्वाचा असून नागरीकांच्या आरोग्यास सुद्धा हानिकारक नाही त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्यासह उपस्थितांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.




Be First to Comment