
पनवेल मधील मराठा बांधव २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे आमरण उपोषणात सहभागी होणार
पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत.या पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी यांच्या वतीने मराठा भवन कार्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे बैठक पार पडली.
या बैठकीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमुखी निर्णय घेतला की, मुंबईत होणाऱ्या या आंदोलनात सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच महाराष्ट्रभरातून येणाऱ्या आपल्या बांधवांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत त्यांच्या अन्न, पाणी व निवासाची सोय करून समाजसेवेचे कार्य पार पाडत मराठा समाजाची ताकद दाखवायची . यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते .




Be First to Comment