
शिवभक्त प्रथमेश भास्कर पुंडे यांच्या संकल्पनेतून करंजाडेकरांची शिवनेरी वारी
पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : छत्रपतींचा आदर्श,विचार समोर ठेवून करंजाडेतील जनसामान्यात रुजावे आणि आदर्श समाज निर्माण व्हावा यासाठी गडकिल्ले संवर्धन आणि दर्शन नियोजन करण्यात येते.या मोहिमेत युनेस्कोने घोषित केलेल्या UNISCO WORLD HERITAGE SITE (जागतिक वारसा स्थळ)वरील दुर्गराज रायगड वारी, किल्ले लोहगड दर्शन व 135 शिवभक्तांच्या सहभागातून शिवनेरी दर्शन मोहीम पार पडली.
बुद्धी,संघर्ष,शौर्य आणि पराक्रमातून सामर्थ्यशाली भारत राष्ट्र उभ राहिलय ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्या साठी बलिदान दिलेल्या मावळ्यांचा कर्तृत्वावर. हिंदुस्थानच्या क्षितिजावर आजही एकच नाव कोरलेले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.स्पर्धात्मक युगात लढण्याचे बळ म्हणजे शिवविचार आणि आदर्श. करंजाडे,पनवेल मधील रहिवाश्यांनी किल्ले शिवनेरीवर इतिहासिक वास्तू पहिल्या व अनुभव घेतला. शिवाई देवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला.
किल्ले शिवनेरी दर्शन मध्ये 3 AC बस व चारचाकी वाहन समावेश होती. नाष्टा,जेवण,फळ,बिस्कीट, चॉकलेट व पाण्याची उत्तम सोय करण्यात आली.तसेच भगवान शिवभक्त म्हणून 4 शिवभक्तांना विठ्ठल रुक्मिणी व भक्ती शक्ती मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच महाराजांच्या इतिहासाबद्दल प्रश्न विचारून विजयी शिवभक्तांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.छत्रपती शिवाजीचा इतिहास व्याख्यानातून सांगून वैदेही मोरे यांनी सर्वांची मने जिंकली.सह्याद्रीच्या प्रवासातील अविस्मरणीय अनुभव करंजाडेकरांनी अनुभवला प्रथमेश भास्कर पुंडे आणि सहकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच योग्य नियोजन,मार्गदर्शन,नेतृत्व क्षमता यामुळे किल्ले शिवनेरी प्रवास सुखरूप झाला. अश्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या .




Be First to Comment