Press "Enter" to skip to content

“आगरी जपाची ना आगरी जापाची”

श्री मंलगगड कल्याण येथे “आगरी ग्रंथालय चळवळ सरावन सरी पर्व ३ रे” संपन्न

मुबंई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील)

“आगरी जपाची ना आगरी जापाची”अशी ज्यांना मनापासून कळवळ असे आगरी ग्रंथालय चळवळ ज्यांनी घेतले समजाचा कल्याण करायचा ध्यास असा समाज कल्याण न्यास मिळून केलेला कार्यक्रम.
सरावन सरी. पर्व ३

श्रीमलंग गाडाचा पायथा. निसर्गाच्या सान्निध्यात तिथला धबधबा.भारी निसर्ग सौंदर्य सगळ्यात भारी होता.यंदा खास आकर्षण ह.प.भ. जगन्नाथ पाटील महाराजांचे प्रवचन,आगरी शौर्यगाथा, चर्चासत्र, सर्वच कार्यक्रम भारी झाले.कविसंमेलन मध्ये जय म्हात्रे याने डाॅ.शोभा ताई पाटील यांच्या कलागुणांवर आधारित कौतुकास्पद कविता केली होती. त्याचे कारण आपली डाॅक्टरी पेशा सांभाळून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात. खेळक्रीडा ,धावणे अनेक पुरस्कारप्राप्त केलेत. नाचगाणी ,गायनाची आवड, वक्तृत्व व प्रस्तावना,समाजाच्या सर्व कार्यक्रमात स्वतःला झोकून कार्य करीत असतात. सरावन सरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अधिक भर देण्याचे काम सर्वेश तरे दादा,दया दादा ला ना त्याचे टीम ने मनापासून मेहनत घेतली. समाजासाठी. १नंबर कार्यक्रम होता ,श्री.सतिश वि.पाटील (मुंबई पत्रकार) असे बरेच समाजातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

महीलांसाठी फेऱ्यांची गाणी हा कार्यक्रम फेऱ्या किंवा फेर धरून नाचने हा आगरी समाजा ची संस्कृती व परंपरा दर्शवते. गणपती व होळीला हा नाच करतात मध्ये ऐक महिला गात असते व एक जण ढोलकी वाजवत असतो आणि महिला गोलाकार करून नाचतात. त्याच्या गाण्यात पौराणिक कथा असतात देवाधर्माच्या.तशेच त्यांच्या जीवन शैलीवर आधारित गाणी असतात.

गायिका होत्या मथुराबाई म्हात्रे उरण खोपटा द्वारका बाई केने आयरे गाव.दोघींनी भारी जुनी गानी सादर केली. दादूस आणि जगदीश दादा पण फेर धरून नाचले. त्यानंतर बांगुऱ्या फेम व ज्यांनी धवलागीत सुरताल मिळवून दिले त्या चंद्रकला ताई दासरी आणि कवयत्री,लेखक, व समाजसेविका धवलारिन संगीताताई पाटील तसेच ज्यांनी सगळ्यात आधी फेऱ्यांची गानी व्हिडिओ ,ऑडिओ व व्हायरल केले ते गायक कवी, संगितकार गीतकार व गायक किसन फुलोरे दादा तसेच गायक, संगीतकार गीतकार लेखक साहित्यिक दया नाईक. ह्या चौघांनी नंतर एवढी सुंदर गाणी गायली की सगळेच,आयोजक, संमेलन अध्यक्ष पण नाचायला लागले.लोकशाहीर (काशीनाथ चिंचय) यांच्या स्मरणार्थ वेसावकर आणि नातेवाईक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंलगगड इतिहास, संशोधक यांचे चर्चासत्र झाले.

एकून काय तर कार्यक्रम हिट होता. सर्वांनीच मनसोक्त एन्जॉय केला.
महीला वर्गाला विनंती आहे आपण बेबी शॉवर, हळदी, पाचव्या, साखरपुडा, वाढदिवस, लग्न, पार्लर शॉपिंग, बैठक सगळीकडे जाता मग आपल्या सरावन सरीला पण येत जा.. समाजाच्या पण कार्यक्रम मध्ये येऊन बघा निशुल्क अगणित पुर्ण दिवसभर पिकनिक सारखा आगळा वेगळा आनंद घेता येतो. नात्या ,जेवणाची उत्तम सोय करण्यात येते.वेग वेगळ्या गावातील शहरातील लोक एकत्र येतात नवीन ओळखी होतात. प्रत्येक वेळी ठिकाण बदली असते.

पहीले पर्व दिंडीगड भिवंडी,दुसरे पर्व बालयोगी सदानंद महाराज आश्रम वसई, तीसरे पर्व मंलगगड पायथा कल्याण पूर्व संपन्न झाले. साहित्यिक, गायक, कवी आणि श्रोते मोठ्या संख्येत उपस्थित राहून
सरावन सरी या पर्वणीचा मनमुराद आनंद घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.