
पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
रायगड : याकुब सय्यद
पत्रकार क्षेत्रातील दांडगा अभ्यास, हसरा चेहरा, मनमिळाऊ स्वभाव, लोक प्रतिनिधी तसेच शासकीय प्रशासकीय यंत्रणांवर आपल्या लेखणीने वचक निर्माण करणारे मितभाषी व जिल्ह्यात सर्वांचे परिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार किरण पितांबर बाथम यांचे अल्पशा आजाराने पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असताना निधन झाले आहे.
किरण बाथम यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना धक्का बसला. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकार क्षेत्रात शोककला पसरली आहे. ते अनेक वृत्तपत्र व टीव्ही चैनल चे रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. रायगड जिल्ह्यातील अनेक पत्रकार संघटनांवर पदाधिकारी म्हणून सध्या ते काम पाहत होते.
रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्र मंडळी व अनेक राष्ट्रीय संघटना तसेच जिल्हास्तरीय पत्रकार संघटनांकडून स्वर्गीवासी किरण बाथम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.




Be First to Comment