
पनवेल(प्रतिनिधी) पक्षाच्या विरोधात वर्तन करत असल्याबद्दल भिंगार ग्रामपंचायतीचे उपसरपंच व भाजप कार्यकर्ते अशोक राजाराम गायकर यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांकरिता निलंबन करण्यात आले आहे.
अशोक गायकर हे पक्षाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेऊन आपल्या वर्तनातून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत असल्याच्या तक्रारी वारंवार पक्षाकडे येत आहेत, त्या अनुषंगाने या संदर्भात वारंवार समज देऊन सुद्धा ते पक्षाविरोधात कार्यवाही करत आहेत. पक्षाच्या विरोधात करण्यात येत असलेल्या वर्तनामुळे उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिफारशीनुसार अशोक गायकर यांचे सहा वर्षांकरिता निलंबन करण्यात आले असून त्या संदर्भातील पत्र भाजपचे पनवेल पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील यांनी अशोक गायकर यांना पाठवले आहे.




Be First to Comment