

मोठ्या संख्येने उमेदवारांनी दाखविली उपस्थिती तर ७२ उमेदवारांना दिले ऑफर लेटर
उरण ( दिनेश पवार )
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय जनता पार्टी उरण यांच्या वतीने तिर्थरूप महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब विष्णू धर्माधिकारी ,उरण नगरपरिषद मराठी शाळा ,पेन्शनर पार्क येथे रविवार ( दि.१७ ) ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उरणचे आमदार महेश बालदी ,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ,भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी,भाजपचे जेष्ठ नेते वाय.टी.देशमुख, दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, पनवेलचे उद्योजक जे.एम.म्हात्रे,पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते..
मेळाव्यात नामांकित ३० कंपन्या सहभागी झाल्या असून दहावी,बारावी,आयटीआय ,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त, अकुशल आदी सुमारे हजारोच्या वर उमेदवार उपस्थितहोते व ४००च्या वर उमेदवारांनी ओंन लाईन फॉर्म भरले होते.आज घेतलेल्या मुलाखत घेतलेल्या उमेदवारान पैकी ७२ उमेदवारांना ऑफर लेटर देण्यांत आले .लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्तेही ऑफर लेटर देण्यांत आले .
आमदार महेश बालदी यांनी चांगले काम केले आहे .त्यांनी हाती घेतलेले काम चांगलेच होते ,उरण परिसरातील इच्छुक उमेदवारांना काम मिळेल माझ्या या उपक्रमास शुभेच्छा आहेत.या उपक्रमास सर्व भाजप कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो .असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले .
आमदार महेश बालदी यांचे कौतुक करावे ते थोडेच आहे . चांगले काम कसे करावे ,कामाची आखणी कशी करावी ,त्यांनी हाती घेतलेले काम ते नेहमीच उल्लेखनीय असतेच त्यांना मी धन्यवाद देतो व त्यांचे मी अभिनंदन करतो.असे पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रसंगी प्रतिपादन केले .
आमदार महेश बालदी यांनी चांगले काम केले आहे .येथे मुलाखत दिलेल्या उमेदवारांना रोजगार मिळेल ,मुलाखत देतांना सेल्फ कॉमफीडंस पहिला जातो.तो वाढवा ,पुढे काही अड़चन आल्यास आमदार महेश बालदी व् मी प्रितम म्हात्रे आपल्याला मदत करू असे पनवेल महानगर पालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी प्रतिपादन केले .
यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवी भोईर,माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे,उरण शहर भाजप अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह,माजी नगरसेवक राजेश ठाकूर ,उरण शहर भाजप महिला अध्यक्ष संपूर्णा थळी,माजी नगरसेविका जानव्ही पंडित, माजी नगरसेविका रजनी कोळी,भाजप रायगड उपाध्यक्ष संगीता पाटील , उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे,भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील,उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड,उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर ,हितेश शाह, माजी जि.प.सदस्य जीवन गावंड ,माजी नगरसेविका प्रियांका पाटील,गौरी मंत्री ,चंद्रकांत घरत,सुधीर घरत,सुरेश पाटील,उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील,हितेश शाह, माजी नगरसेवक नवीन राजपाल ,जासई विभाग अध्यक्ष शमिता ठाकूर ,जासई पंचायत समिती सरचिटणीस अतुल ठाकूर,शैलेश गावंड ,प्रतिक गोंधळी,मेघनाथ तांडेल, भाजप उरण तालुका सह खजिनदार सुशांत पाटील,,सुप्रिया म्हात्रे,अनंत घरत,कुणाल शिसोदिया,गौरव कोळी,देवेंद्र घरत,संदीप पानसरे,व भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते.




Be First to Comment