
प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेची भरभराटी अधिक होणार – जनार्दन जाधव
पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण मधील प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेला २१ वर्षं होत असताना आतापर्यंत लाखोंची उलाढाल होत असताना येणाऱ्या काळात पतसंस्थेची भरभराटी अधिक होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जनार्दन जाधव यांनी सांगितले.
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महात्मा गांधी वाचनालय येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी सचिव अनंत जाधव यांनी मागील वर्षाचा इतिवृत्त वाचून दाखवला असता त्याला सभासदांनी मंजुरी देत नवीन सभासदा बरोबरच पतसंस्थेतून सर्वसामान्य आणि गरजूंना कर्ज उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तर यावेळी पतसंस्थेच्या तक्रार निवारण समितीवर राजेश कांबळे, प्रा.डॉ.डी.के.बामणे, साहेबराव गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेला संस्थेचे संचालक मंडळ मारुती खाडे, लक्ष्मण मोरे, अपर्णा वाघमारे, वसंत शिरसाट, अरविंद वाघमारे, शैलेश जाधव, मनस्वी शिरसाट तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Be First to Comment