Press "Enter" to skip to content

करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाचे आयोजन


करंजाडेतील ऑपरेशन सिंदूर समर्पित असलेली दहीहंडीचे विशेष आकर्षण..

पनवेल/प्रतिनिधी :– करंजाडे वसाहतीत ऑपरेशन सिंदूर ला समर्पित दहीहंडी उत्सव आकर्षण राहिली. करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळ आयोजित मा. सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दहीहंडी उत्साहात पार पडली. यावेळी या मानाची दहीहंडी पनवेल कोळीवाडा येथील जय महाराष्ट्र शिवतेज व्यायाम शाळा पनवेल कोळी समाज या पथकाने दहीहंडी फोडली.

याप्रसंगी कार्यक्रमाला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष उद्योजक जे. एम म्हात्रे, माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, मा नगरसेवक नितीन पाटील, गणेश कडू, संदीप पाटील, सुनील बहिरा, विनोद साबळे, निलेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल (प) मंडळ अध्यक्ष भाजपा रुपेश धुमाळ, गजानन पाटील, समिर केणी, कुणाल लोंढे, रिल्स स्टार साक्षी देशमुख, निखिल भोपी यांच्यासह भाजप पदाधिकार, कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

मा सरपंच रामेश्वर आंग्रे, यांच्या माध्यमातून “ऑपरेशन सिंदूर या विषयावर” दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई, ठाणे, कर्जत, पनवेल, नवी मुंबईतील सुमारे 20 ते 25 दहीहंडी पथकाने चार, पाच, सहा थरांची सलामी दिली. यावेळी सलामी देण्याऱ्या पथकाचे आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर यावर्षी जय महाराष्ट्र शिवतेज व्यायाम शाळा पनवेल कोळी समाज पथकाने सलामी देत करंजाडेतील “ऑपरेशन सिंदूरला समर्पित असलेली दहीहंडी” फोडली. यावेळी मा सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे पाप उघड केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवढ्याना त्यांची जागा दाखवत धडा शिकवला. पनवेल, करंजाडेमध्ये सतत पाऊस पडत असूनही, या कार्यक्रमातील गोविंदांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या उत्सवात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. मित्रपरिसरासह करंजाडेकर, प्रशासन व पोलिसांनी चांगल्याप्रकारे सहकार्य केल्याबद्दल आंग्रे यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.