
पेण, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात परंपरागत होत असलेल्या गोकुळाष्टमी, दहीहंडी सण उत्सवानिमित्त शासनाने घातलेल्या ध्वनीक्षेपणाच्या कंट्रोलचे गोविंदा पथकांच्या मार्फत उल्लंघन होऊ नये याकरीता आज संध्याकाळी पेण पोलिसांकडून शहराच्या नाक्या नाक्यावर ध्वनींचे नमुणे घेण्यात आले आहे.
पेण उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली सदर सणांकरीता पोलिस सज्ज झाले असून दहीहंडी उत्सवात शहरातील लावण्यात येणाऱ्या दहीहंड्या व त्यासाठी असणारी साऊंड सिस्टीम याचे ध्वनीक्षेपण होताना आवाजाची मर्यादा पाळावी कार्यक्रमाठिकाणी ध्वनीक्षेपणाद्वारे कोणतेही उल्लंघन होऊ नये अन्यथा अशांवर पर्यावरण (संरक्षण) कायदा सन १९८६ व ध्वनीप्रदुषण ( विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० मधील तरतूदी नुसार क्षेत्र व झोन प्रमाणे ठरवून दिलेली ध्वनी तिव्रताचे व दिलेल्या वेळेचे उल्लंघन होत असल्यास अशांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल त्यामुळे या सणानिमित्त पोलिसांकडून आज ध्वनीमापक संयंत्रणेद्वारे ध्वनीचे कंट्रोल नमुणे घेण्यात आले आहे.
नागरीकांनी सण उत्सव शांततेत साजरे करावेत कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वागू नये असे आवाहन डीवायएसपी जालिंदर नालकुल यांनी केले असून आज घेण्यात आलेल्या आवाज कंट्रोलचे नमुने वेळी पोलिस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, संतोष चव्हाण, पोलिस कर्मचारी किशोर घरत, निलेश ठाकूर,राम सुर्यवंशी आदि उपस्थित होते.




Be First to Comment